
अनेकांना घरात फिशटँक ठेवणे किंवा मासे पाळण्याचा शौक असतो. काही ठिकाणी ऑफिसमध्येही मोठा फिशटँक ठेवलेला असतो. वास्तूशास्त्रानुसार घरात फिशटँक ठेवणे हे शुभ असते की अशुभ असा अनेकांना प्रश्न पडतो. आज आपण याबद्दल जाणून घेणार आहोत.

वास्तुशास्त्रानुसार घरात मत्स्यालय (फिशटँक) ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे घरात सुख, समृद्धी आणि भरभराट येते, तसेच जीवनातील अनेक समस्या दूर होतात, असे म्हटलं जाते.

फिशटँक केवळ घराची शोभा वाढवत नाही तर यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि प्रगती निर्माण होते. पण यासाठी तुम्ही फिशटँक योग्य दिशेला ठेवणं गरजेचे आहे.

वास्तुशास्त्रानुसार, मत्स्यालयामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि एकोपा वाढतो. जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश मिळवण्याचा मार्ग सोपा होतो. तसेच, हे घरामध्ये धन आणि समृद्धीचा प्रवाह वाढवण्यास मदत करते.

मत्स्यालय ठेवण्यासाठी घराची उत्तर, पूर्व किंवा उत्तर-पूर्व दिशा सर्वोत्तम मानली जाते. उत्तर दिशेला मत्स्यालय ठेवल्याने करिअरमध्ये प्रगती होते. तसेच नवीन संधी मिळतात.

जर तुम्ही पूर्वेला मत्स्यालय ठेवल्याने जीवनात आनंद आणि सकारात्मकता येते. पण फिशटँक बेडरूममध्ये ठेवणे टाळा ते अशुभ मानले जाते. तसेच किचनमध्येही फिशटँक ठेवू नका, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते.

फिशटँकमध्ये 8 ते 9 मासे असणे शुभ मानले जाते. त्यात प्रामुख्याने गोल्डन फिश, फ्लॉवर हॉर्न आणि एंजेल फिश ठेवावेत, ते शुभ असतात. तसेच जर तुम्हाला गोल्डन फिश आवडत असतील तर 8 गोल्डन फिश आणि 1 काळा मासा ठेवावा.

मत्स्यालयातील पाणी नियमितपणे बदला. मत्स्यालयाची नियमित स्वच्छता केल्याने तुम्हाला सकारात्मक बदल दिसतील.

घराच्या दक्षिण दिशेला मत्स्यालय ठेवणे अशुभ मानले जाते. ज्या कुटुंबात विनाकारण तणाव किंवा भांडणे होत असतील, त्यांनी गुरुवारी घराच्या पूर्व-उत्तर दिशेला सोनेरी माशांचा फोटो लावावा. यामुळे कुटुंबातील सदस्यांची सहनशक्ती वाढते आणि कौटुंबिक वाद कमी होतात.

फेंगशुईशास्त्रानुसार, घरात माशांचे फोटो लावल्याने घरातील सदस्यांवरील संकटे टळतात आणि आर्थिक प्रगती होते.

फेंगशुईमध्ये माशांचा संबंध समृद्धीशी आहे आणि जर मासे जोडीमध्ये असतील तर ते अधिक शुभ मानले जाते.

त्यामुळे घरात मासे ठेवणं शक्य नसेल तर फोटो लावावा. यामुळे उत्तर किंवा ईशान्य दिशेला लावल्याने घरातील सदस्यांना सौभाग्य प्राप्त होते आणि संकटांपासून त्यांचे रक्षण होते.