Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल सोबत सिया गोयलचे असे खासगी फोटो, विश्वासच बसणार नाही

Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आता मोठे अपडेट समोर येण्यास सुरुवात झाली आहे. सध्या केतन आणि सिया यांचे असे फोटो व्हायरल होत आहेत, जे पाहिल्यानंतर तुम्हाला देखील विश्वास बसणार नाही की, सिया हिने मोठी कट रचून होणारा पती केतन याचा काटा काढला आहे.

| Updated on: Jun 28, 2026 | 8:19 AM
1 / 5
 केतन अग्रवाल आणि सिया गोयल गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत आणि त्यामागे कारण आहे केतन याच्या हत्येचं... कुटुंबियांनी सिया हिचं लग्न केतन या श्रीमंत उद्योजकासोबत ठरवलं, पण सिया हिच्या मनात काही वेगळंच शिजत होतं. त्याची कोणी कल्पना देखील केली नसेल.

केतन अग्रवाल आणि सिया गोयल गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत आणि त्यामागे कारण आहे केतन याच्या हत्येचं... कुटुंबियांनी सिया हिचं लग्न केतन या श्रीमंत उद्योजकासोबत ठरवलं, पण सिया हिच्या मनात काही वेगळंच शिजत होतं. त्याची कोणी कल्पना देखील केली नसेल.

2 / 5

सिया हिने केतन सोबत साखरपुडा केला, साखरपुड्यात दोघे आनंदी देखील दिसत होतं... पण दिसतं तसं नसतं, असं म्हणतात तेच खरं आहे. कारण साखरपुड्यानंतर केतनचा अशा प्रकारे अंत होईल कोणालाच माहिती नव्हतं.. सोशल मीडियावर सिया आणि केतन यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल झाले.

3 / 5

सिया आणि केतन यांचा साखरपुडा फेब्रुवारी महिन्यात झालेली. नोव्हेंबर मध्ये उदयपूर याठिकाणी दोघांचा भव्य विवाहसोहळ होणार होता. त्यासाठी कोट्यवधी रुपये देखील खर्च करण्यात आले. एवढंच नाही तर, एक चार्टड प्लेन देखील बूक करण्यात आलेला. केतन आणि सिया एकमेकांसोबत आनंदी आहेत हे पाहून कुटुंबिय देखील आनंदी होते.

4 / 5

पण असं काहीही नव्हत सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओ सिया कडून करण्यात आलेलं फक्त एक नाटक होतं.. अशीच चर्चा आता सर्वत्र सुरु आहे. कारण सियाला केनत याच्यासोबत लग्न करायच नव्हतंच . सियाचं चेतन चौधरी नावाच्या एका तरुणावर प्रेम होतं.

5 / 5

याच कारणामुळे केतन याला मार्गातून बाजूला करण्यासाठी चेतन आणि सिया यांनी एक योजना केली आणि केतन याचा काटा काढला. चेतन आणि सिया यांनी लोहगड किल्ल्यावरील 400 फूट खोल दरीमध्ये केतन याला ढकललं. सुरुवातीला सर्वांना हा अपघात वाटला. पण चौकशी केल्यानंतर सियाने केतनची हत्या केल्याचं रहस्य समोर आलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us