Mumbai: जणू मुंबईतील गोवाच..; ही खास जागा पाहण्यासाठी परदेशातूनही येतात पर्यटक

मुंबईच्या गिरगावात अशी एक ऐतिहासिक वाडी आहे, जिथे गेल्यानंतर आपण गोव्यात किंवा पोर्तुगालमध्ये आल्याचा भास होतो. रंगीबेरंगी पोर्तुगीज शैलीतील बंगले, अरुंद गल्ल्या आणि शेकडो वर्षांचा इतिहास असलेल्या या वाडीला परदेशी पर्यटकही आवर्जून भेट देतात.

| Updated on: Nov 25, 2026 | 9:55 AM
1 / 5
Mumbai: मुंबई म्हटलं की डोळ्यांसमोर उंचच उंच इमारती, लोकल ट्रेनची गर्दी, गजबजलेले रस्ते आणि धावपळीचं आयुष्य येतं. पण याच मुंबईत अशी एक जागा आहे, जिथे पाऊल ठेवताच आपण एखाद्या जुन्या गोव्यात किंवा पोर्तुगालमधील छोट्याशा गावात आल्याचा भास होतो. विशेष म्हणजे, या जागेचं सौंदर्य पाहण्यासाठी केवळ मुंबईकरच नाही, तर परदेशातूनही पर्यटक येतात.

Mumbai: मुंबई म्हटलं की डोळ्यांसमोर उंचच उंच इमारती, लोकल ट्रेनची गर्दी, गजबजलेले रस्ते आणि धावपळीचं आयुष्य येतं. पण याच मुंबईत अशी एक जागा आहे, जिथे पाऊल ठेवताच आपण एखाद्या जुन्या गोव्यात किंवा पोर्तुगालमधील छोट्याशा गावात आल्याचा भास होतो. विशेष म्हणजे, या जागेचं सौंदर्य पाहण्यासाठी केवळ मुंबईकरच नाही, तर परदेशातूनही पर्यटक येतात.

2 / 5

या ठिकाणाचं नाव आहे खोताची वाडी! गिरगाव परिसरात वसलेली ही ऐतिहासिक वाडी म्हणजे मुंबईच्या जुन्या संस्कृतीचा आणि वास्तुकलेचा अनमोल ठेवा आहे. खोताची वाडीचा इतिहास साधारण 18व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत जातो. या जागेचं नाव 'खोत' या आडनावावरून पडलं आहे. वामन हरी खोत हे पाठारे प्रभू समाजातील जमीनमालक होते. त्यांच्या मालकीच्या जमिनीचे वेगवेगळे भूखंड करून ते स्थानिक कुटुंबांना देण्यात आलं.

3 / 5

विशेषतः ईस्ट इंडियन ख्रिश्चन समुदायातील कुटुंबांनी इथं आपली घरं बांधली आणि वस्ती केली. 1880 मध्ये मुंबई महानगरपालिकेने या परिसराला अधिकृतपणे 'खोताची वाडी' हे नाव दिलं. खोताची वाडीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथली रंगीबेरंगी जुनी घरं. लाल, निळ्या, पिवळ्या आणि पांढऱ्या रंगातील लाकडी बंगले, उतरती कौलारू छतं, प्रशस्त व्हरांडे, लाकडी खिडक्या, सजवलेल्या बाल्कनी आणि घरांसमोरील छोट्या बागा पर्यटकांचं लक्ष वेधून घेतात.

4 / 5

इथले अरुंद रस्ते, लहान चॅपल, जुन्या इमारती आणि शांत वातावरण यामुळे या परिसराला 'मुंबईतील मिनी गोवा' किंवा 'ओल्ड गोवा' असंही म्हटलं जातं. 1995 मध्ये खोताची वाडीला ग्रेड-३ हेरिटेज परिसराचा दर्जा देण्यात आला. एकेकाळी या परिसरात सुमारे 65 पारंपरिक बंगले होते. मात्र, पुनर्विकास आणि उंच इमारतींच्या वाढत्या प्रभावामुळे त्यांची संख्या कमी झाली आहे. आता मोजकीच जुनी घरं या वारशाची साक्ष देत उभी आहेत.

5 / 5

मुंबईच्या गजबजाटात एखादं शांत, सुंदर आणि ऐतिहासिक गाव अनुभवायला मिळणं हीच खोताची वाडीची खासियत आहे. इथली वास्तुकला, जुन्या घरांच्या भिंतींमधून डोकावणारा इतिहास, स्थानिक संस्कृती आणि फोटोग्राफीसाठी सुंदर कोपरे यामुळे इतिहासप्रेमी, आर्किटेक्चरचे विद्यार्थी, छायाचित्रकार आणि परदेशी पर्यटक येथे भेट देतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us