
किंग कोब्रा हा साप सर्वांधिक विषारी सापांपैकी एक मानला जातो. त्याचं थोडंजरी विष मानवी शरीरात गेलं की मृत्यू अटळ आहे, असं मानलं जातं.

किंग कोब्रा हा साप अनेक अर्थांनी विशेष आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हा साप शारीरिकदृष्या फारच ताकतवान असतो. तो त्याची शक्ती वापरून जमीनपासून दोन मिटरपर्यंत उंच जाऊ शकतो.

किंग कोब्रा या सापाचे विष फारच संहारक असे मानले जाते. हा साप एकदा चावल्यानंतर त्यातून निघणाऱ्या विषातून साधारण 20 लोक मरू शकतात असं मानलं जातं.

एकदा दंशात हा साप साधारण 420 मिलीग्रॅम एवढं विष सोडतो, असं या क्षेत्रातील जाणकार सांगतात. दुर्दैवाने भारतात या सापाच्या विषावर मात करणारे औषध सापडलेले नाही.

किंग कोब्रा अन्न म्हणून रॅट स्नेक, अन्य कोब्रा, छोटे अजगर यांना खातो. किंग कोब्रा जंगलात सापडणे हे फार चांगले मानले जाते. त्यामुळे या प्रजातीचे संरक्षण केले पाहिजे, असे सर्पमित्र सांगतात.

तसेच ग्रामीण भागात या सापापासून बचाव कसा करावा, याबाबतही जनजागृती करायला हवी, अशी अपेक्षाही सर्पमित्र व्यक्त करतात.