
उन्हाळा सुरु झाला की सापांच्या दोन घातक जाती जागी होतात. चार महिने झोपल्यानंतर उन्हाळा सुरु होताच ते जागे होतात. कोब्रा आणि घोणस हे साप उन्हाळ्यात भक्ष्याचा शोध सुरु करतात. मार्च-एप्रिल महिन्यात मैदाने, शेती या भागांत हे फिरत असतात.

घोणस साप सामान्यतः भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशात आढळतात. त्याची लांबी साधारणतः 3-4 फूट असते. परंतु ती 6 फूटांपर्यंतही वाढू शकते. त्याच्या दंशाने वेळीच उपचार न मिळाल्यास माणसाला वाचण्याची शक्यता कमी असते.

घोणस साप चावल्यावर हेमेटोटॉक्सिन विष सोडते. या विषामुळे पीडित व्यक्तीच्या शरीरातील रक्तप्रवाह वाढतो. त्यामुळे त्याच्या रक्तपेशी नष्ट होतात आणि स्नायू वितळू लागतात. वेळीच उपचार मिळाल्यास या सापाच्या चाव्यापासून जीव वाचू शकतो.

कोब्रा साप आपल्या भक्ष्याला घाबरवण्यासाठी आपले डोके वर करतो. त्यानंतर शरीर सरळ करत धोकादायक मुद्रेत येतो. त्यानंतर वेगाने हल्ला करतो. तो जास्त करुन रात्रीच सक्रीय असतो.

कोब्रा हा साप दिसण्यास सुंदर आणि आकर्षक आहे. परंतु त्याचे विष कितीतरी पटीने जास्त विषारी आहे. भारतीय कोब्रा सहसा उन्हाळ्यात दिसतो. हा फक्त भारत-पाकिस्तानमध्ये आढळतो.

भारतीय कोब्रा सामान्यतः तपकिरी किंवा काळा रंगाचा असतो. त्यावर पांढरे किंवा पिवळे ठिपके असतात. त्याच्या विषामध्ये न्यूरोटॉक्सिन असते. चावल्याबरोबर ते न्यूरोटॉक्सिन सोडतेय जे व्यक्तीच्या मज्जासंस्थेवर हल्ला करते. त्यामुळे स्नायू लकवा होतात.