
टीम इंडियाचा स्टार खेळाडू संघात पुन्हा परतणार असल्याने संघाची ताकद आणखी दुप्पट होणार आहे. हा खेळाडू लवकरच श्रीलंकेच्या फाइट साठी उड्डाण भरण्याची शक्यता आहे. कारण त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमी कडून फिटनेस सर्टिफिकेट मिळाले आहे.

हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून विकेटकीपर के. एल. राहुल आहे. राहुल हा संघाचा एक महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून दुखापतीमुळे तो संघाबाहेर बाहेर होता. आशिया कपसाठी त्याची निवड झाली मात्र त्याला फिटनेस सर्टिफिकेट द्याव लागणार आहे.

आपल्या मांडीच्या शस्त्रक्रियेनंतर राहुल शस्त्रक्रियेनंतर बंगळुरू मधील एनसीए मध्ये तो ट्रेनिंग घेत आहे. आता तो बरा झाला असून केव्हाही संघात परतू शकतो. त्यामुळे संघासाठी चांगली बातमी म्हणावी लागेल.

के. एल. राहुल परतला तर संघात कोणाच्या जागी त्याला संधी द्यायची हा मोठा प्रश्न आहे. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात इशान किशन याने दमदार फलंदाजी करत मोहोर उठवली आहे. त्यामुळे त्याला बाहेर करणं अवघड आहे.

आशिया कपमध्ये उद्या 4 सप्टेंबरला नेपाळविरूद्ध टीम इंडियाचा दुसरा सामना होणार आहे. या सामन्यातही के. एल. राहुल नसणार आहे. त्यापुढच्या सामन्यांसाठी तो संघात एन्ट्री करणार आहे.