Tips & Tricks : फेकता येत नाही, तुटत नाही, चोरी तर नाहीच.. फिजिकल सिम कार्ड e-SIM मध्ये कसं बदलायचं ?

जर तुमच्या फोनमध्ये फिजिकल सिम असेल आणि तुम्हाला ते e-SIM मध्ये रूपांतरित करायचे असेल, तर या सोप्या टिप्स जाणून घ्या, तुमचं का झटक्यात होईल.

| Updated on: Sep 30, 2025 | 12:57 PM
1 / 6
BSNLने अलीकडेच निवडक टेलिकॉम सर्कलमध्ये ई-सिम सेवा सुरू केली आहे. खाजगी टेलिकॉम कंपन्या एअरटेल, जिओ आणि व्ही (व्होडाफोन आयडिया) या तर आधीच e-SIM कार्ड ऑफर करतात.

2 / 6
eSIM हे एका भौतिक सिम कार्डसारखे काम करतं, जे युजर्सना e-SIM ला सपोर्ट करणाऱ्या डिव्हाइसवर चांगले नेटवर्क कनेक्टिव्हिटी प्रदान करतं. तुम्ही Appleचा फोन अर्थात iPhone, Google Pixel आणि Samsung Galaxy S सिरीज सारख्या फोनवर e-SIM सेवेचा आनंद घेऊ शकता. जर तुमच्या फोनमध्ये फिजिकल सिम असेल आणि तुम्हाला ते ई-सिममध्ये रूपांतरित करायचे असेल, तर सोपी युक्ति जाणून घ्या.

3 / 6
 ज्यांच्याकडे एकापेक्षा जास्त सिम कार्ड आहेत त्यांच्यासाठीe-SIM  अधिक सोयीस्कर आहे. e-SIM चा आणखी एक फायदा म्हणजे ते फेकून देता येत नाही किंवा तोडता येत नाही किंवा चोरीलाही जाऊ शकत नाही. जर तुमचे कार्ड Jio, Airtel किंवा Vi यापैकी एखाद्या कंपनीचे असेल तर तुम्ही ते या सोप्या पद्धतीने ई-सिममध्ये रूपांतरित करू शकता.

4 / 6
Reliance Jio : e-SIM सेवेचा लाभ घेण्यासाठी, रिलायन्स जिओ वापरकर्त्यांनी त्यांच्या फोन सेटिंग्जमध्ये त्यांचा 32-अंकी EID आणि 15-अंकी IMEI क्रमांक प्रविष्ट करणे आवश्यक आहे. त्यानंतर, "GETESIM <32-अंकी ईआयडी><15-अंकी आयएमईआय>" टाइप करून 199 वर मेसेज संदेश पाठवा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या रसिस्टर्ड ईमेल आयडीवर 19 अंकी व्हर्च्युअल ई-सिम नंबर मिळेल. त्यानंतर तुम्ही 199 वर "SIMCHG <19-अंकी ई-सिम नंबर>" असा मेसेज पाठवा. ई-सिम विनंती प्रक्रिया झाल्यानंतर, तुम्हाला सुमारे दोन तासांच्या आत त्याबद्दल मेसेज मिळेल.

5 / 6
Airtel :  जर तुम्ही एअरटेल यूजर असाल, तर तुम्हाला प्रथम "eSIM रजिस्टऱ् ईमेल पत्ता" असा मजकूर असलेला SMS 121 वर  पाठवावा लागेल. त्यानंतर, एक मेसेज येईल आणि तुम्हाला तुमच्या eSIM विनंतीची पुष्टी करण्यासाठी "1" ने उत्तर द्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमची ओळख पटवण्यासाठी एअरटेलच्या प्रतिनिधीला कॉल करावा लागेल आणि ई-सिमचा QR कोड तुमच्या रजिस्टर्ड ईमेल पत्त्यावर पाठवला जाईल. हा QR कोड स्कॅन करून, तुम्ही ई-सिम वापरण्यास सुरुवात करू शकाल.

6 / 6
Vodafone-Idea : Vi युजर्सना त्यांच्या मोबाईल नंबरवरून "eSIM रजिस्टर्ड ईमेल आयडी" टाइप करून 199 वर मेसेज पाठवावा लागेल. मेसेजची कन्फर्म केल्यानंतर, eSIM चा QR कोड त्यांच्या रजिस्टर्ड ईमेल पत्त्यावर पाठवला जाईल. हा QR कोड डिव्हाइसच्या नेटवर्क सेटिंग्जमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि eSIM वापरण्यास सुरुवात करण्यासाठी वापरला जाऊ शकतो.