
उदय चोप्रा हा धूम 3 चित्रपटानंतर परत बाॅलिवूडच्या चित्रपटामध्ये दिसला नाही. गेल्या काही दिवसांपासून उदय चोप्रा हा चित्रपटांपासून दूर आहे.

उदय चोप्रा याचे एका मागून एक चित्रपट फ्लाॅप जाताना दिसले. आता तर तो अभिनयापासूनही दूर आहे. यश चोप्राचा लेक असूनही उदय चोप्राला काही धमाका करण्यात यश मिळाले नाही.

सतत चित्रपट फ्लाॅप जाऊनही उदय चोप्रा हा आज कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे आणि तो वर्षाचा कोट्यवधी रूपये कमाई करतो.

अत्यंत लग्झरी लाईफस्टाईल उदय चोप्रा हा जगतो. उदय चोप्राकडे 40 कोटींचे नेटवर्थ आहे. 5 कोटी तो दरवर्षाला साधारणपणे कमाई करतो.

उदय चोप्रा आपल्या वडिलांच्याच कंपनीमध्ये काम करतो. YRF एंटरटेनमेंटचा उदय चोप्रा सीईओ आहे. आज उदय चोप्राचा 51 वा वाढदिवस आहे.