
बॉलिवूड हरहुन्नरी अभिनेत्री सोहा अली खान आज तीचा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्री सोहा अली खान ही दिग्गज अभिनेत्री शर्मिला टागोर टागोर आणि क्रिकेटर मंसूर अली खान यांची मुलगी.

नवाबी घराण्यात जन्मलेल्या सोहाने लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स अँड पॉलिटीकल सायन्समधून पदवी शिक्षण पूर्ण केले आहे.

पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

यानंतर भारतात परतून तिने फोर्ड फाउंडेशन आणि सिटी बँकमध्ये नोकरी देखील केली

2004 मध्ये बंगाली चित्रपट ‘इति श्रीकांता’मधून तिने मनोरंजन विश्वात पदार्पण केले.

शाहीद कपूरसोबत ‘दिल मांगे मोर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

तिचा ‘रंग दे बसंती’हा चित्रपट खूप गाजला.

2017मध्ये सोहा अली खानची मुलगी ‘इनाया’च्या जन्मानंतर तिने चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला.

ASSOCHAM Ladies Leagueच्या वतीने सोहा अली खानला वुमन ऑफ द डिकेड या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.