
तुमच्या पीएफ खात्यात किती रक्कम आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ईपीएफओच्या साईटवर जाऊन पासबुक तपासण्याची गरज नाही. केवळ मोबाईलच्या एका बटनावर तुमच्या खात्यात पीएफची दरमहा किती रक्कम जमा होते हे तुमच्या लक्षात येईल.

मोबाईलवर एक नंबर डायल करून तुम्हाला PF खात्यात किती रक्कम आहे हे माहिती करून घेता येईल. त्यासासाठी मोबाईलमध्ये 9966044425 हा मोबाईल क्रमांक सेव्ह करून ठेवा

तुम्ही हा नंबर डायल केल्यावर तो अगदी काही सेकंदात आपोआप कट होईल. त्यानंतर तुम्हाला एक SMS मिळेल. या एसएमएसवर तुम्हाला पीएफ खात्यातील शिल्लकी विषयी माहिती मिळेल. हा नंबर डायल केल्यावर तुम्हाला तो कट करायचा नाही.


त्यासाठी युझर्सला “EPFOHO UAN No.” असे लिहून 7738299899 या क्रमांकावर पाठवावे लागेल. त्यानंतर एक एसएमएस येईल. त्यात शिल्लक रक्कमेची माहिती असेल. EPFOHO लिहिल्यानंतर एक स्पेस द्यायला विसरू नका. त्यानंतर तुमचा UAN क्रमांक टाका

पण जर तुम्हाला मिस कॉलच्या माध्यमातून पीएफ बॅलेन्स किती आहे हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला UAN खाते क्रमांक, आधार अथवा पॅन क्रमांक लिंक असणे गरजेचे आहे.