
तुम्ही छतावरील टाकी पाहिली असेलच. ही टाकी तुम्हाला कायम गोलकार दिसते. जगातील कुठल्याही कोपऱ्यात अशी टाकी तुम्हाला बाहेर पाहायला मिळेल. इतकंच काय तर टाकीवरील पट्ट्याही महत्त्वाचं काम करतात. (फोटो साभार: Housing)

टाकी गोलकार असल्याने दीर्घ काळापर्यंत सुरक्षित राहते. कारण कोणत्याही वस्तूत पाणी भरलं की त्याचा दाब चारही बाजूला असतो. त्यामुळे टाकी फुटण्याची शक्यता असते.कारण टाकी पीवीसीने बनवलेली असते.(फोटो साभार: Gharpedia)

जर टाकीचा आकार चौकोनी असता तर त्याच्या प्रत्येक कोपऱ्यावर दबाव पडला असता. पण गोलाकार टाकीमुळे हा दाब डिव्हाईड होतो. पण चौकोनी टाकीत शक्यता कमी असते.(फोटो साभार: Indiasmart)

गोलाकार टाकीवर काही डिझाईनही दिसून येते. टाकीवरील लाईनचही खूप महत्त्व आहे. यामुळे टाकीला मजबुती मिळते. उन्हाळ्यात टाकीचं व्यास वाढत नाही आणि दबाव कंट्रोलमध्ये राहतो. (फोटो साभार: OriPlast)

फुटलेली टाकी जर तुम्ही पाहिली असेल तर एक गोष्ट आवर्जून लक्षात येईल, ती म्हणजे गोलाकार पट्ट्यांमध्ये टाकीला काही होत नाही. जिथे टाकी प्लेन असते त्या भागातच फुटण्याची शक्यता जास्त असते. कारण या लाईनमुळे मजबुती वाढते. (फोटो साभार: Jei Aqua Tech)