
करण जोहर दिग्दर्शित 'कुछ कुछ होता है' हा चित्रपट आजही अनेकांच्या लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. 1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला तुफान यश मिळालं होतं. यामध्ये शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

या तीन कलाकारांशिवाय चित्रपटातील एका लहान मुलीने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. शाहरुख खानच्या ऑनस्क्रीन मुलीची भूमिका साकारणारी सना सईद आता 33 वर्षांची झाली आहे. तिचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल!

गेल्या वर्षी सनाने तिच्या बॉयफ्रेंडशी साखरपुडा केला. नवीन वर्षाचं निमित्त साधत बॉयफ्रेंडने जानेवारी 2023 मध्ये सनाला प्रपोज केलं आणि तिने होकार दिला. सना गेल्या काही महिन्यांपासून साबा वॉनरला डेट करतेय. साबा हा हॉलिवूड साऊंड डिझायनर आहे. तो लॉस एंजिलिसमध्ये राहतो.

सना पहिल्यांदाच ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटात बालकलाकार म्हणून दिसली होती. या चित्रपटानंतर तिने ‘हर दिल जो प्यार करेगा’ आणि ‘बादल’मध्ये बालकलाकार म्हणून काम केलं होतं. 2012 मध्ये सना ही करण जोहर दिग्दर्शित ‘स्टुडंट ऑफ द इअर’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात सना सईद तिच्या हॉट लूकमुळे चर्चेत होती.

सना सध्या अभिनयविश्वापासून दूर आहे. मात्र ती अनेक टीव्ही शोज पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसते. याशिवाय ती सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह आहे. ती तिचे खास फोटो आणि व्हिडीओ तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत राहते.