Ladki Bahin : लाडक्या बहिणींची मोठी गर्दी, या कामाची मुदत संपत आल्याने मोठ्या रांगा; काय घडतंय?

एकीकडे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असतानाच काही लाडक्या बहिणींनी मात्र शासकीय कार्यालयात मोठी रांग लावली आहे. केवायसीत दुरुस्ती करण्यासाठी उद्याची शेवटची तारीख असल्याने ही गर्दी होत आहे.

| Updated on: Mar 30, 2026 | 3:54 PM
1 / 5
ई केवायसीमधील झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी जालन्यातील महिला व बालविकास कार्यालयात महिलांच्या रांगा लागल्या आहेत. लाडकी बहीण योजनेचा हप्ता खात्यात जमा होण्यासाठी तांत्रिक बाबींची पूर्तता करणे अनिवार्य आहे.

2 / 5
मात्र,अनेक महिलांच्या अर्जामध्ये ई-केवायसी (E-KYC) किंवा बँक खात्याच्या केवायसीमध्ये चुका झाल्या असल्याने त्यांना लाडक्या बहिणीच्या हप्त्यापासून वंचित राहावं लागलं. आता खबरदारी म्हणून या चुका दुरुस्त करण्यासाठी ग्रामीण भागातूनही महिला मोठ्या संख्येने शहरात येत आहेत.

3 / 5
अनेक लाडक्या बहिणींना मागच्या चार ते पाच महिन्यांपासून हप्त्याची रक्कम मिळत नसल्याने वंचित राहावं लागलं आहे. त्यामुळे उद्या (31 मार्च) शेवटचा दिवस असल्याने ही गर्दी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

4 / 5
दरम्यान उद्या 31 मार्च रोजी ही मुदत संपत असल्याने तत्पूर्वीच लाडक्या बहिणी केवायसीमधील चुका दुरुस्त करण्यासाठी आता जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला बालकल्याण विभाग गाठत आहेत.

5 / 5
त्यामुळे पुन्हा एकदा मुदतवाढ मिळणार का? याकडे सर्वच लाडक्या बहिणीचं लक्ष लागले. केवायसीत चुका असल्याने लाभार्थी लाडक्या बहिणींना यापूर्वेच काही हप्ते मिळालेले नाहीत. महिलांनी लवकरात लवकर आपल्या चुका दूर कराव्या असे आवाहन केले जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us