
रकुलप्रीत सिंह अनेकदा तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. सध्या ती तिच्या आगामी 'सरदार का ग्रँडसन' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

रकुलप्रीत सिंहनं पुन्हा एकदा तिचा लेडी बॉस अवतार दाखवला आहे. नुकतंच तिनं सुंदर ड्रेसमध्ये काही फोटोशूट केले आहेत.

तिच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर लाँच होण्यापूर्वी रकुलनं फोटोशूट केले ज्यामध्ये तिनं गुलाबी रंगाचा सिंगल शोल्डर टॉप कॅरी केला आणि त्यासोबत ब्लॅक फिटिंग पॅन्ट परिधान केला होता.

या ड्रेससह रकुलने न्यूड टोन्ड हील्स कॅरी केली. तसेच,सुंदर हेअरस्टाईल केली. तिने आपल्या लुकला पूर्ण करण्यासाठी हुप इयररिंग्ज आणि मिशो रिंग कॅरी केली.

रकुलच्या या ड्रेसचे श्रेय लेबनीज फॅशन डिझायनर दालिदा आयच यांना जाते. हा ड्रेस रकुलवर खूपच सुंदर दिसत आहे.

रकुलप्रीतला स्टाईल केलं आहे अंशिका वर्मा आणि अनिशा माहेश्वरी यांनी.