‘नवसाला पावणारा सुवर्ण गणपती’… जीएसबी बाप्पाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविकांची गर्दी

मोठ्या थाटामाटात भक्तांनी लाडक्या बाप्पाचं स्वागत केलं आहे. सर्वजनिक मंडळांनी देखील मोठ्या उत्साहात गणरायाचं स्वागत केलं. आता जीएसबीच्या बाप्पाच्या दर्शनासाठी मोठी रांग लावली आहे.

| Updated on: Sep 16, 2026 | 3:43 PM
1 / 5
मुंबईच्या वडाळा येथील जीएसबी सार्वजनिक गणेशोत्सव समितीकडून यंदा ७२ वा गणेशोत्सव साजरा होतोय, भक्तांची मोठी रांग लागलीये….

मुंबईच्या वडाळा येथील जीएसबी सार्वजनिक गणेशोत्सव समितीकडून यंदा ७२ वा गणेशोत्सव साजरा होतोय, भक्तांची मोठी रांग लागलीये….

2 / 5

‘नवसाला पावणारा सुवर्ण गणपती’ म्हणून जीएसबीच्या बाप्पाची विशेष ओळख आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविकांची गर्दी होत असते.

3 / 5

पारंपरिक वैदिक पद्धतीने बाप्पाची पूजाविधी करण्यात आली. वैदिक ऋचांच्या उच्चारांसह धार्मिक विधीं देखील पार पडल्या. पाच दिवसांच्या उत्सवात हजारो पूजा आणि नवस फेडण्याचे विधी तसेच भाविकांसाठी महाप्रसाद आणि अन्नदानाची विशेष व्यवस्था इथे असते.

4 / 5

जीएसबी बाप्पाची भव्य मूर्ती शाडूच्या मातीपासून साकारलेली असून, 703 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा रेकॉर्डब्रेक विमा उतरवण्यात आला आहे.

5 / 5

सांगायचं झालं तर, किंग्स सर्कल येथील 'जीएसबी सेवा मंडळ' यंदा आपला ७२ वा उत्सव साजरा करत आहे. येथे 5 दिवसांच्या काळात कडक शिस्त आणि पारंपरिक पोशाखात हजारो विशेष पूजा व महाअभिषेक पार पडतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us