गणपती चालले गावाला…! लालबागच्या राजाचं विसर्जन करताना भाविकांचे डोळे पाणावले, लाडक्या गणरायाला निरोप

लालबागच्या राजाला अखेर 22 तासांनतर गिरगाव चौपाटीवर पोहोचला. लालबागचा राजा जवळपास सकाळी सातच्या सुमारास समुद्राजवळ पोहोचला. यावेळी चौपाटीवर भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होती.
नवसा्ला पावणारा अशी ख्याती असलेला लालबागचा राजा काल शुक्रवारी दुपारी 1 वाजता मंडपातून निघाला होता. मंडपातून बाहेर पडल्यानंतर भाविकांनी राजाचं दिमाखात स्वागत केलं होतं.
लालबागपासून ते गिरगाव चौपाटीपर्यंत राजाला निरोप देण्यासाठी भाविकांची गर्दी होती. ढोल-ताशाच्या गजरात भाविक राजाला निरोप दिला.
लालबागच्या राजाची आरती संपन्न झाल्यानंतर त्याच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढण्यात आले. राजाच्या अंगावरील दागिने काढतानाचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.
राजाची मूर्ती विसर्जनासाठी अत्याधुनिक बार्जवर ठेवण्यात आला. त्यानंतर समुद्रात खोलवर नेण्यात आलं. कोळी बांधव देखील मोठ्या प्रमाणात चौपाटीवर दाखल झाले. त्यानंतर लाडक्या राजाचं विसर्जन करण्यात आलं.