
मणिपूर येथील नोनी जिल्ह्यात भूस्खलनाची घटना घडली आहे. घटनेनंतर गेल्या दोन दिवसापासून घटनास्थळावर बेपत्ता जवान व नागरिकांचे शोध कार्य सुरु आहे.

मणिपूरमधील नोनीतील तुपुल येथील भूस्खलन घटनास्थळी भारतीय लष्कर, आसाम रायफल्स, प्रादेशिक सेना, SDRF आणि NDRF यांच्याकडून शोध मोहीम सुरूच आहे. शोधातील प्रयत्नांना गती देण्यासाठी आज सकाळी नवीन पथके तैनात करण्यात आली.

आतापर्यंत 13 टेरिटोरिअल आर्मीचे जवान आणि 5 नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे, तर 18 टेरिटोरिअल आर्मीचे जवान, 6 नागरिकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बेपत्ता 12 प्रादेशिक लष्कराचे जवान आणि 26 नागरिकांचा शोध अजूनही सुरू आहे.

डीजीपी पी डोंगेल यांच्या म्हणण्यानुसार, या घटनेत अजूनही ढिगाऱ्याखाली झाले किती लोक अडकले आहेत , याची पुष्टी झालेली नाही. गावकरी, लष्कर आणि रेल्वे कर्मचारी, मजूर यांच्यासह 60 लोक अडकल्याची माहिती आहे. मोठ्या प्रमाणावर झाडांचा ढिगारा पडल्यामुळे शोधकार्यात अडचणी येत आहेत .

जिरीबामला इंफाळशी जोडण्यासाठी एक रेल्वे मार्ग तयार केला जात होता, ज्याच्या सुरक्षेसाठी 107 टेरिटोरियल आर्मीचे जवान तैनात करण्यात आले होते. बुधवारी रात्री येथे भूस्खलन झाले असून त्यात अनेक जवान गाडले गेले.