लपंडाव मालिकेतल्या सखी-कान्हाचं हटके प्री-वेडिंग फोटोशूट

गेल्या काही वर्षांत प्री-वेडिंग फोटोशूटचं प्रचंड फॅड आलंय. लग्नाआधी नयनरम्य ठिकाणी, त्या-त्या थीमनुसार कपडे परिधान करून फोटोशूट करण्याला अनेक जोडप्यांची पसंती असते. आता रील लाइफमधल्याही एका जोडप्याने हे प्री-वेडिंग फोटोशूट केलं आहे.

Updated on: Nov 13, 2025 | 1:53 PM
1 / 5
'स्टार प्रवाह' वाहिनीवरील 'लपंडाव' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. या मालिकेत सुरु झालीय सखी-कान्हाच्या लग्नाची धामधूम. लग्नाची तयारी तर जल्लोषात सुरु आहे. पण त्याआधी सखी-कान्हाने एक हटके प्री-वेडिंग फोटोशूट केलं.

2 / 5
भव्यदिव्य सिनेसिटी स्टुडिओमध्ये हे फोटोशूट पार पडलं. मालिका विश्वात पहिल्यांदा अशाप्रकारे प्री-शूटिंग करण्यात आलंय. पारपंरिक आणि मॉडर्न अश्या दोन्ही लूकमध्ये सखी-कान्हाने फोटोशूट केलंय.

3 / 5
सखी -कान्हा म्हणजेच अभिनेता चेतन वडनेरे आणि अभिनेत्री कृतिका देवचं खऱ्या आयुष्यात प्री वेडिंग फोटो शूट झालं नाहीय. त्यामुळे दोघांसाठी हा नवा अनुभव होता. "तीन वेगवेगळे लूक आम्ही केलेत. सिनेसिटी स्टुडिओमध्ये जगभरातील प्रेक्षणीय स्थळांच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत," असं त्यांनी सांगितलं.

4 / 5
"भन्नाट दिवस होता. नेहमीच्या शूटिंगपेक्षा काहीतरी वेगळं करताना खूप धमाल आली," अशी भावना कृतिका आणि चेतनने व्यक्त केली. या मालिकेत श्रेया कुलकर्णी, विवेक अग्रवाल, सायली सांभरे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. नुकतीच या मालिकेत रुपाली भोसलेचीही एण्ट्री झाली आहे.

5 / 5
कृतिका देवची लपंडाव ही पहिलीवहिली मालिका आहे. यामध्ये ती सखी कामतची भूमिका साकारत आहे. तर अभिनेता चेतन वडनेरे कान्हाच्या भूमिकेत आहे. 'लपंडाव' ही मालिका दुपारी 2 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.