मंगेशकर बहिणींचं 71 वर्षं जुनं गाणं; इतकं गाजलं की… ‘त्या’ ओळींवर पैज लावायचे लोक, स्वतः उषा मंगेशकरांनी केला खुलासा

हिंदी चित्रपटसृष्टीतील जुन्या गाण्यांचा विषय निघाला की त्यांच्या चाली, संगीत आणि लक्षवेधी शब्दांची आठवण नक्कीच होते. अनेकदा गाणं तयार करताना असे किस्से घडतात की ते कायम लक्षात राहतात. अलीकडेच ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनी एका पॉडकास्टमध्ये मनसोक्त संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक आठवणी सांगितल्या.

| Updated on: Nov 02, 2026 | 2:35 PM
1 / 5
सन 1955 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आजाद’ या चित्रपटातील ‘अपलम चपलम’ हे गाणं आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. या गाण्याचे बोल गीतकार राजेंद्र कृष्ण यांनी लिहिले होते. त्यांच्या लेखणीतून अनेक अजरामर गाणी तयार झाली.

सन 1955 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आजाद’ या चित्रपटातील ‘अपलम चपलम’ हे गाणं आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. या गाण्याचे बोल गीतकार राजेंद्र कृष्ण यांनी लिहिले होते. त्यांच्या लेखणीतून अनेक अजरामर गाणी तयार झाली.

2 / 5

‘अपलम चपलम’ हे गाणं लता मंगेशकर आणि त्यांच्या धाकट्या बहीण उषा मंगेशकर यांनी एकत्र गायलेलं असंच एक सदाबहार गाणं आहे. दोन्ही बहिणींच्या आवाजातील सुरेल जुगलबंदीमुळे या गाण्याला विशेष लोकप्रियता मिळाली.

3 / 5

विशेष म्हणजे पडद्यामागे दोन बहिणींनी आपल्या आवाजातून गाणं गाजवलं, तर पडद्यावरही दोन बहिणींची जोडी पाहायला मिळाली. या गाण्यात लोकप्रिय नृत्यांगना जोडी साई आणि सुब्बुलक्ष्मी यांनी नृत्य सादर केले होते.

4 / 5

महत्त्वाची बाब म्हणजे उषा मंगेशकरांनी दिलेल्या मुलाखतीत या गाण्याचा किस्सा सांगितला की, प्रदर्शित होताच गाण्याने धुमाकूळ घातला. सर्वात चर्चेत आलेली बाब म्हणजे दोन्ही बहिणींचा आवाज एका तालात आणि सुरात होता.

5 / 5

या गाण्याबाबत पुढे उषा मंगेशकर म्हणाल्या, लोक पैज लावायचे... खरंच... आम्ही चकित झालो... यामधील काही ओळी तर अशा होत्या की लोक पैज लावायचे कोणती ओळ लता गायली आहे आणि कोणती मी... इतकेच नाही तर त्यांनी दीदींसोबत गाणं गायला खूप छान वाटायचं, ती सावरून घ्यायची, नंतर चाल पुन्हा शिकवायची असे सांगितले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us