
राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रु आहे. रागामध्ये माणूस अनेकदा दुसऱ्याच नुकसान करतो. पण काहीवेळा माणसाच स्वत:च नुकसान सुद्धा होतं.

बिश्नोई समाजाचे गुरु जंभेश्वर यांनी 29 नियम बनवले आहेत. त्याच आधारावर बिश्नोई समाजाची स्थापना झाली. लॉरेन्स बिश्नोईच्या पूर्वजांनी सुद्धा गुरु जंभेश्वर यांची दीक्षा घेतली. हे सर्व नियम मानण्याचा संकल्प केला.

पण लॉरेन्स बिश्नोई एक नियम वारंवार मोडतो, तो म्हणजे न रागवण्याचा नियम.

गुरु जंभेश्वर यांनी बनवलेल्या 29 नियमांमध्ये न रागवण्याचा 20 वा नियम आहे. या नियमानुसार तुम्हाला तुमचा राग, क्रोध नियंत्रणात ठेवावं लागतं.

पण लॉरेन्स बिश्नोईला इतका राग येतो की, त्याने अनेक गुन्हे केलेत. त्यामुळेच तो आज तुरुंगात आहे. लॉरेन्सला सलमान खानचा खूप राग आहे. त्याला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली आहे.