
भारतातील बरेच लोक सांधेदुखीमुळे त्रस्त आहेत. त्यामध्ये वृद्धांची संख्या जास्तच आहे. सांध्यातील दुखण्याचे मुख्य कारण म्हणजे अनियमित खाण्याच्या सवयी आणि खराब जीवनशैली हे आहे.

सांधेदुखी दूर करण्यासाठी आपण दररोज व्यायाम केला पाहिजे. त्यामध्ये आपण चालणे, पोहणे, दोरीवरच्या उड्या, सायकलिंग आणि योगा करू शकता.

सांधेदुखीची समस्या दूर करण्यसाठी फायबर, व्हिटॅमिन डी, कॅल्शियम इत्यादी समृद्ध असलेला निरोगी आहार घ्या. तसेच आपण वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करा.

जेव्हा आपल्या गुडघ्यांना दुखत असेल तेव्हा त्यांना योग्य विश्रांती द्या आणि जेव्हा आपण बाहेर चालत असाल तेव्हा गुडघा कॅप घाला. सूज कमी करण्यासाठी उपाय करा.

सांधेदुखीची समस्या दूर करण्यासाठी चांगला आहार आणि हिरव्या भाज्या देखील आपण आपल्या आहारात घेतल्या पाहिजे.