
प्रत्येकाला सुंदर आणि चमकदार त्वचा हवी असते. त्वचा तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी महिला अनेक मार्ग अवलंबतात. चेहऱ्याच्या फेशियलपासून ते क्लीन अपपर्यंत हजारो रुपये खर्च करतात. जर काही कारणास्तव वेळ उपलब्ध नसेल, तर घरगुती उपचार केले जातात. पावसाळ्यामध्ये लोक चिकट त्वचेने त्रस्त असतात. त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी तुम्ही फेस शीट मास्क वापरू शकता.

फेस मास्कमध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे असतात. जी त्वचेतील ओलावा काढून पोषण देण्याचे काम करतात. पण असे असूनही चेहऱ्यावर चमक येत नाही. फेस शीट मास्क लावताना तुमच्या तुम्ही काही चुका करतात. ज्यामुळे फेस शिट मास्क लावूनही त्वचेला चमक येत नाही.

पावसाळ्यात मुरुमांच्या समस्येवर मात करण्याशाठी फॉलो करा 'या' टिप्स

घाणेरड्या हातांनी फेस शिट मास्क लावणे टाळा - फेस शिट मास्क लावण्यापूर्वी आपले हात चांगले धुवा. जर तुमचे हात गलिच्छ असतील तर हातातील जंतू आणि बॅक्टेरिया चेहऱ्यावर येतील. बराच वेळ फेस शिट मास्क लावल्याने फारसा फायदा होत नाही. तुम्ही तुमच्या पॅकेजनुसार ते लागू करा अन्यथा तुमची त्वचा खराब होऊ शकते.

मोठ्या प्रमाणावर फेस शिट मास्क लावणे - बरेच लोक चांगले परिणाम मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात फेस मास्क लावतात. तरीही काही फरक पडत नाही. नेहमीच्या लेयरमध्ये स्वच्छ त्वचेवर फेस मास्क लावा. मास्क लावताना लक्षात ठेवा की आपण वीस मिनिटांपेक्षा अधिक वेळ फेस शिट मास्क चेहऱ्यावर नको.