
आपल्या शरीराचे कार्य योग्यरित्या चालण्यासाठी हायड्रेशन खूप महत्वाचे आहे. इतर पोषक घटकांप्रमाणेच, आरोग्य चांगले ठेवण्यासाठी पाणी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. दिवसभरात किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्या. पण पाणी पिताना काही नियम पाळले पाहिजेत. आपण दररोज पाणी पिताना काही चुका करतो.

सर्वजण आपल्याला उभे राहण्याऐवजी खाली बसून पाणी पिण्याचा सल्ला देतात. याचे कारण म्हणजे उभे राहून पाणी पिल्याने नसांमध्ये ताण निर्माण होतो, शरीरातील द्रव संतुलन बिघडते आणि अपचन होऊ शकते. आयुर्वेदातही उभे पाणी न पिण्याचा सल्ला दिला आहे.

जेव्हा आपल्याला खूप तहान लागते. तेव्हा घाईघाईने पाणी पिण्याची आपली प्रवृत्ती असते. पण खूप लवकर पाणी प्यायल्याने किडनी आणि मूत्राशयावर दाब पडतो. योग्य पचनासाठी पाणी हळूहळू प्यावे.

वजन कमी करण्यासाठी बऱ्याच लोकांना आहारात कॅलरीज कमी ठेवण्यासाठी जेवणापूर्वी पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पण आयुर्वेदात ही माहिती योग्य मानली जात नाही. आयुर्वेदानुसार आपले पोट 50 टक्के अन्न आणि 25 टक्के पाण्याने भरले पाहिजे. उर्वरित 25 टक्के पचनासाठी रिकामे ठेवावे. त्यामुळे जेवण्यापूर्वी पाणी प्यायल्यास शरीराला योग्य पोषण मिळत नाही.