International Yoga Day 2021 : राज्यभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा, पाहा फोटो

| Updated on: Jun 21, 2021 | 12:11 PM

राज्यातील शहरांपासून ते गावखेड्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी हा दिवस उत्साहात साजरा करण्यात येतोय. (Celebrated International Yoga Day across the state, see photo)

1 / 5
आज जगभर आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा केला जातोय. त्यानिमित्त अनेक ठिकाणी योगा करत हा दिवस साजरा करण्यात आला. राज्यातील शहरांपासून ते गावखेड्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी हा दिवस उत्साहात साजरा झाला.

2 / 5
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे आयोजित योगवर्गात सहभागी होत योगासनं केली. यावेळी राजभवनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी देखील योगवर्गात सहभाग घेतला.

3 / 5
खेड्यातही आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात आला. गडचिरोलीत योगा दिवसाचं औचित्य साधत जिल्ह्यातील दुर्गम भागातील  खेड्यातही योगा दिवस साजरा करण्यात आला. आपल्या जीवनात सुदृढ राहण्यासाठी योगा किती महत्त्वाचा आहे हे पटवून देण्यासाठी आर्ट ऑफ लिविंगकडून हा उपक्रम राबवण्यात आला.

4 / 5
उस्मानाबाद जिल्ह्यातील आठ वर्षाच्या हिंदवी चौरे या चिमुकलीची गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली असून निरालंबा पूर्ण चक्रासन या योगासनाच्या प्रकारामध्ये तिने जगाच्या नकाशावर आपलं नाव कोरलं आहे. अवघ्या साडेपाच  मिनिटात तिनं 100 चक्रासन केले. एवढया कमी वेळात शंभर चक्रासन करणारी ती पहिली लहान मुलगी ठरली आहे. तिच्या या  योगाची दखल गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं  घेतली आहे.

5 / 5
जागतिक योग दिन सर्वत्र साजरा होत आहे. जेजुरीतील मार्तंड देवसंस्थानच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या कोव्हिड केअर सेंटरमध्येही  योग दिन साजरा करण्यात आला. येथील रुग्ण आणि कर्मचारी वर्गासाठी योग प्रशिक्षण देण्यात आलं.