
आपण बऱ्याच लोकांना असे बोलताना ऐकले असेल की, माझा आहार खूप कमी आहे. तरीही माझे वजन झपाट्याने वाढते. कितीही प्रयत्न केले तरी वजन कमी होत नाही.

अशा लोकांसाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की, अनेक वेळा वजन वाढण्याचे कारण फक्त अन्नच नाही तर काही वाईट सवयी आहेत. वाढत्या वजनामुळे माणसाला लहान वयातच अनेक आजार जडतात.

अशा स्थितीत लठ्ठपणा तर वाढतोच शिवाय पचनाशी संबंधित अनेक समस्यांचाही धोका असतो. त्यामुळे आतापासून रोज रात्री जेवल्यानंतर काही वेळ चाला.

रात्रीचे जेवण झाल्यावर काही वेळ फिरायला जाणे आवश्यक असते. जेणेकरून अन्नाचे पचन व्यवस्थित होईल. मात्र, आपल्यापैकी बरेच लोक रात्रीचे जेवन झाले की, लगेचच झोपण्यासाठी जातात.