
Covid 19

Covid

फेशियल पॅरालिसिसमध्ये अचानक आपला चेहरा लूज पडतो. तसेच डोळे झाकताना आणि बोलताना आपल्याला त्रास होतो. ही फेशियल पॅरालिसिसमधील साधारण लक्षणे आहेत. ही समस्या काही दिवसांमध्ये दूर होते. जास्तीत-जास्त ही लक्षणे सहा महिन्यांपर्यंत दिसतात.

फेशियल पॅरालिसिसची ही लक्षणे नेमकी कशामुळे होतात. हे शास्त्रज्ञांना अजून समजू शकले नाही. मात्र, कोरोनामध्ये रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होत असल्यामुळे हे होण्याची शक्यता असल्याचे शास्त्रज्ञाचे मत आहे. यामुळे आपल्या चेहऱ्यावर सूज देखील येते.

जॉन्स हॉपकिन्सच्या मते, फेशियल पॅरालिसिस मधुमेह, उच्च रक्तदाब, इजा, काही इतर रोग, संक्रमणांमुळे होतो. दरवर्षी फेशियल पॅरालिसिस होणाऱ्यांची संख्या अगदी कमी असते. मात्र, कोरोनाच्या लसीमुळे फेशियल पॅरालिसिस होणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

यामध्ये हेही तेवढेच खरे आहे की, कोरोनाची लस घेतल्यामुळे फेशियल पॅरालिसिस होणाऱ्यांची संख्या अगदी कमी आहे. जामा ओटोलेरिंगोलॉजी - हेड अँड नेक सर्जरी यांच्या पथकाने जगातील 41 आरोग्य संस्थांकडून इलेक्ट्रॉनिक वैद्यकीय नोंदी गोळा केल्या.

या नोंदींमध्ये, डॉक्टरांनी जानेवारी ते डिसेंबर 2020 दरम्यान कोविड ग्रस्त रूग्णांचा शोध घेतला. त्यामध्ये असे दिसून आले की, कोरोनाचा संसर्ग झालेल्या काही लोकांना फेशियल पॅरालिसिस लक्षणे दिसून आली.

एकूण 348,000 रूग्णांपैकी डॉक्टरांना 284 रूग्णांमध्ये फेशियल पॅरालिसिस लक्षणे दिसून आली आहेत. यावरून असे म्हणता येईल की, कोविड रूग्णांमध्ये फेशियल पॅरालिसिस धोका 0.08% आहे.