
चारोळी खाणे जसे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच आपल्या त्वचेसाठी देखील चारोळी फायदेशीर आहे. चारोळीमध्ये प्रथिने, जीवनसत्व सी आणि व्हिटॅमिन बीचा चांगला स्रोत आहे. यामुळे त्वचेच्या सर्व समस्या दूर होतात.

मुरुमांचा त्रास असल्यास चारोळीमध्ये गुलाब पाणी मिक्स करा आणि मुरुमांवर लावा. आपण हा पॅक चेहऱ्याला आठवड्यातून तीन ते चार वेळा लावला पाहिजे. यामुळे आपल्या चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर होते.

आपल्या शरीराला सारखी खाज सुटत असेल तर आपण खोबरेल तेलामध्ये चारोळी बारीक करून मिक्स करा. जेंव्हा अंगाला खाज सुटल्यासारखी वाटते. त्यावेळी हे तेल अंगाला लावा.

जर आपल्या त्वचेवर काळपटपणा आला असेल तर आपण चारोळीची बारीक पेस्ट करून त्यामध्ये दूध मिसळावे. हा फेसपॅक आठवड्यातून तीन ते चार वेळा चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्यावरील काळपटपणा कमी होईल.

चारोळीमध्ये गुलाब पाणी मिक्स करा आणि रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.