
उन्हाळ्याच्या हंगामात फळे आणि भाज्या फ्रिजमध्ये ठेवल्या जातात. परंतु आपणास माहित आहे का? की, काही भाज्या आणि फळे फ्रीजमध्ये ठेवणे हानिकारक आहे. तज्ज्ञांच्या मते, आंबा, कलिंगड, लीची आणि इतर काही फळे फ्रीजमध्ये ठेवणे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे.

केळी हे एक सुपर फूड आहे जे वर्षभर उपलब्ध असते. केळी फ्रिजमध्ये ठेवू नये. यामुळे इथिलीन नावाचा वायू बाहेर पडतो जो इतर फळांना देखील खराब करतो आणि केळी देखील खराब होतात.

उन्हाळ्याच्या हंगामात, बहुतेक लोक लीची खरेदी करतात आणि फ्रीजमध्ये ठेवतात. लीची फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे लीची खराब होते. मात्र, वरून लीची चांगली दिसते आणि आतमध्ये खराब होते.

आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी सोबतच कॉपर, झिंक, पोटॅशियमसारखे अनेक मिनरल्स असतात. जे आपल्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहेत. मात्र, आंबा फ्रीजमध्ये ठेवणे टाळले पाहिजे.

लिंबू, संत्री आणि मोसंबी यासारखी फळे कधीही फ्रीजमध्ये ठेऊ नये. ही फळे फ्रीजमध्ये ठेवल्यास फळाच्या सालावर काळे डाग पडतात आणि ते सुकण्यासही सुरवात होते.