
कोणत्याही प्रवासाला जाताना त्याचं योग्यरित्या नियोजन केलं जातं. कुठे राहायचं? काय खायचं? इतकंच काय तर बजेटमध्ये बसतं का? इथपर्यंत प्लानिंग केलं जातं. पण कधी कधी हॉटेलमध्ये रुम बुक करताना छोटीशी चूक महागात पडते.

अनेकदा स्वस्त आणि मस्त रुम मिळत असल्याने ऑनलाईन बुकिंगला पसंती दिली जाते. पण हॉटेलमध्ये गेल्यावर कळतं की बुक केलेली रूम पँट्रीजवळ आहे. इथे भांड्याचा आणि इतर गोष्टींच्या आवाजामुळे शांतता भंग पावते. त्याचबरोबर चिडचिड होते.

अनेकदा लिफ्टच्या बाजूला रुम बुक केला जातो. लोकं लिफ्टचा वापर मोठ्या प्रमाणात करत असल्याने शांत झोप मिळणं कठीण होतं. त्यामुळे या ठिकाणी चुकूनही रुम बूक करू नका.

अनेकदा स्वस्त आणि मस्तच्या नादात हॉटेलमध्ये रुम बुक केला जातो. पण यामुळे त्रास होण्याची जास्त शक्यता असते. स्वस्तात रुम तर मिळतो पण सुविधांची वाणवा असते.

ग्रुप ट्रॅव्हलिंग करत असाल तर लोकेशनवर जाऊन रुम बुक करा. पहिल्यांदा बुकिंग केलं आणि नंतर सुविधा नाही मिळाल्या तर मूड खराब होतो. तिथे पोहोचल्यावर हॉटेलची पूर्ण माहिती घ्या आणि नंतर रुम बुक करा.