
दह्यामध्ये भरपूर फायदेशीर बॅक्टेरिया असतात. जे आपल्या शरीरासाठी खूप चांगले असते. दह्यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन बी-2, व्हिटॅमिन बी-12 इ. मॅग्नेशियम असते. दही आपले शरीर थंड ठेवण्यासाठी मदत करते. यामुळे उन्हाळ्याच्या हंगामामध्ये दह्याचा आपल्या दररोजच्या आहारामध्ये नक्कीच समावेश करा.

काकडी आणि बुंदी रायता उन्हाळ्यात खाणे अधिक फायदेशीर ठरते. मात्र, कधीही काकडी आणि बुंदी रायत्यामध्ये कांदा अजिबात टाकू नका. दही आणि कांदा एकत्र खाल्ल्यास अॅलर्जी आणि त्वचेच्या विविध समस्या निर्माण होऊ शकतात.

बऱ्याच लोकांना दही आणि आंबा सोबत खाण्यासाठी आवडते. मात्र, हे आपल्या त्वचेसाठी जास्त हानिकारक आहे. आंबा आणि दही एकत्र खाल्ल्याने शरीर अतिरिक्त थंड होते आणि त्वचेच्या समस्या निर्माण होतात.

दही आणि मासे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. मात्र, हे सोबत खाणे अजिबात चांगले नाहीये. यामुळे पचनाच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

अनेक लोक मुळ्यासोबत दह्याचे सेवन करतात, जे आरोग्यासाठी चांगले नाहीये. जर आपण मुळ्याचे पराठे जरी केले तरीही ते अजिबात दह्यासोबत खाऊ नका. यामुळे गॅसची समस्या निर्माण होऊ शकते.