
हिवाळ्यातील थंडगार वातावरणामुळे आपण कमी प्रमाणात पाणी पितो. ज्यामुळे डिहायड्रेशनची समस्या निर्माण होऊ शकते. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी पाणी पिणे खूप महत्वाचे आहे. जास्त पाणी प्या आणि स्वत: ला हायड्रेटेड ठेवा.

रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी सर्वात महत्वाचा आहार आहे. सुकामेवा, हिरव्या भाज्या, फळे आणि शेंगा इत्यादींचे सेवन करा. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मिळते.

तणावाचा थेट परिणाम रोगप्रतिकारक शक्तीवर होतो. तणाव किंवा चिंता शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत करते. यामुळे तणाव टाळण्यासाठी दररोज योगा करा.

शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी झोप खूप महत्वाची आहे. कमी झोप आणि ताण घेतल्याने रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो.

शरीरातील व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, लोहाची पातळी तपासण्यासाठी आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे. यावरून तुम्हाला कळेल की शरीरात कोणत्या जीवनसत्वाची कमतरता आहे.