
बटाटे- हाताखालील दुर्गंधी दूर करण्यासाठी तुम्ही बटाट्याची मदत घेऊ शकता. बटाट्याचा तुकडा घ्या आणि थोडा वेळ हाताखाली ठेवा. यामुळे दुर्गंधी दूर होण्यास मदत होते.

नारळाचे तेल- नारळाचे तेल अंडरआर्म्सची दुर्गंधी दूर करण्यासाठी देखील फायदेशीर आहे. हातात थोडे खोबरेल तेल घ्या आणि थोडा वेळ मसाज करा.

टोमॅटोचा रस: टोमॅटो किसून त्याचा रस एका भांड्यात काढा. आता कापसाच्या साहाय्याने अंडरआर्म्सवर लावा. यामुळे दुर्गंधी दूर होते. हा उपाय आठ दिवसातून दोन वेळा करा.

लिंबू : त्वचेची काळजी घेण्यारासाठी लिंबू फायेदशीर आहे. तुम्हाला अर्धा चमचा बेकिंग सोडा एक चमचा लिंबाच्या रसात मिसळून ही पेस्ट हाताखालील भागावर लावा.

अॅपल सायडर व्हिनेगर: अॅपल सायडर व्हिनेगर अंडरआर्म्सचा वास दूर करण्यास मदत करते. एका भांड्यात थोडे पाणी घ्या आणि त्यात दोन चमचे अॅपल सायडर व्हिनेगर घाला. आता या पाण्याने अंडरआर्म्स धुवा.