
उन्हाळ्याच्या हंगामामध्ये त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. मेकअप केल्यानंतर आपली त्वचा चांगली साफ करणे देखील महत्वाचे आहे. चांगले मॉइश्चरायझर त्वचेला हायड्रेशन ठेवण्यास मदत करते. उन्हाळ्याच्या हंगामामध्ये तर त्वचेला हायड्रेशन ठेवणे अतिशय महत्वाचे काम आहे.

आपली त्वचा चांगली मॉइश्चरायझेशन झाल्यावर सूर्याच्या किरणांपासून संरक्षण होण्यास मदत होते. नेहमीच ब्रॉड स्पेक्ट्रम SPF च्या वापर करा. यामुळे त्वचा तजेलदार राहण्यास मदत होते. सनस्क्रीन लागल्याशिवाय बाहेर अजिबाच जाऊ नका.

मेकअपचा पहिला टप्पा हा प्राइमरने सुरू होतो. प्राइमरमुळे मेकअपला त्वचेला चिकटून राहण्यास मदत होते. मेकअपमध्ये प्राइमर हे सर्वात महत्वाचे आहे. यामुळे प्राइमर चांगले निवडा.

बरेच लोक मेकअपचे साहित्य कमी किंमतीवाले निवडतात. मात्र, तसे अजिबात करू नका. कारण जेवढी ब्रॅन्डेड वस्तू तितका आपला लूक छान दिसतो आणि त्वचेचे नुकसान देखील होत नाही.

नेहमी मेकअप करताना बेसवर जास्त लक्ष द्या. फाउंडेशन डिच करा आणि बीबी क्रीम्सचा वापर करा. ब्लश डाग जाण्यासाठी आणि क्रीमयुक्त फॉर्म्युलेसह लेयर करावी. उन्हाळ्यासाठी मॅट लिपस्टिक लावणे टाळा.

उन्हाळ्याच्या हंगामामध्ये चेहऱ्यावर सतत घाम येतो. यामुळे मेकअपसाठी चांगले उत्पादने निवडा. उन्हाळ्यामध्ये वॉटरप्रूफ मेकअप करणे शक्यतो फायदेशीर ठरते.