
आजकाल केसांमध्ये कोंडा होण्याची समस्या अगदी सामान्य झाली आहे. कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी आपण खोबरेल तेलामध्ये ग्लिसरीन मिसळून लावावे. यामुळे कोंड्याची समस्या कायमची दूर होण्यास मदत होते.

वाढते प्रदूषण आणि तणावामुळे केसांची चमक कमी होते. शॅम्पू केल्यानंतर केसांची चमक परत येण्यासाठी ग्लिसरीन मिसळलेल्या पाण्याने एकदा केस धुवा. काही दिवसात तुम्हाला फरक दिसून येईल.

बऱ्याच लोकांना दोन तोंडी केसांची समस्या असते. मग अशावेळी आपण केसांना ग्लिसरीन लावले पाहिजे. ग्लिसरीन दोन तोंड्याच्या केसांची समस्या फटाफट दूर करते.

शॅम्पू केल्यानंतर केसांना कंडिशनरऐवजी ग्लिसरीन लावा आणि नंतर थंड पाण्याने धुवा. असे काही दिवस सतत करा आणि मग फरक पहा. यामुळे आपले केस चमकदार होण्यास मदत होते.

केसांच्या चांगल्या वाढीसाठी तुम्ही ग्लिसरीनला केसांच्या काळजीचा एक भाग देखील बनवू शकता. यासाठी केसांना शॅम्पू करताना तेलात ग्लिसरीनचे काही थेंब मिसळा आणि मग आपले केस धुवा.(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)