
काही पदार्थ पाण्यात भिजवून खाल्ल्यास दुप्पट फायदेशीर ठरतात. असे पदार्थ आपण आपल्या रोजच्या आहारात वारंवार खातो. ते पदार्थ कोणते आहेत ते जाणून घेऊया.

कडधान्य, डाळ पाण्यात भिजवली तर फायटिक ऍसिड आणि दूषित पदार्थ काढून टाकते. तसेच डाळ आणि कडधान्य लवकर शिजते. त्याचे पौष्टिक मूल्य वाढते आणि कडधान्ये सहज पचतात.

प्रत्येकजण तांदूळ धुतो आणि शिजवतो. पण तांदूळ शिजवण्यापूर्वी पाण्यात भिजवला तर त्यातील पोषणमुल्य वाढते. शिवाय तांदूळ पाण्यात भिजवून शिजवल्यास लवकर शिजतो.

पाण्यात भिजवल्यानंतर ओट्स आणि क्विनोआ वापरल्याने हानिकारक रसायने काढून टाकतात. त्यामुळे पोषणमूल्ये वाढते.

बदामासोबतच शेंगदाणे आणि अक्रोड पाण्यात भिजवून ठेवता येते. त्याशिवाय सुके अंजीर आणि मनुका पाण्यात भिजवून ठेवल्याने आरोग्यास अधिक फायदे मिळतात.

भाज्या आणि फळे जास्त पाण्यात भिजवू नका. पण जर तुम्ही बाजारातून भाजी खरेदी केली असेल तर ती पाण्यात थोडा वेळ भिजत घाला. हे भाज्यांमधून धूळ, घाण आणि रसायने काढून टाकते.