
चहा... अनेकांसाठी हा चहा कंटाळा घालवणारा असतो. कधी हा चहा उत्साह वाढवतो. तर कधी मित्रांसोबत बोलण्यासाठी एक हक्काची वेळ देतो... हाच रोजचा चहा अधिक टेस्टी बनवायचा असेल तर दोन साध्या गोष्टी कामी येतील.

सगळ्यात आधी थोडं पाणी उकळायला ठेवा. पाण्याचा एक उकळी आल्यानंतर त्यात थोडं आलं किसून टाका... मग त्यात चहापत्ती टाका आणि हे सगळं मिश्रण काही वेळासाठी उकळू द्या.

मग त्यात दूध टाका... दूध टाकल्यानंतरही त्याला छान उकळू येऊ द्या. मग त्यात साखर अॅड करा... आता चहाला उकळू द्या. चहा होत आल्याचं लक्षात आल्यानंतर त्यात थोडी इलायची पावडर टाका... आता हा चहा पिण्यासाठी तयार आहे

आलं आणि इलायची पावडर टाकल्याने चहाला एक वेगळीच चव येते. इलायची पावडरमुळे चहाला वेगळा सुगंध येतो. तर आल्यामुळे चहाला एक वेगळीच चव येते. एकदा असा चहा ट्राय कराच...

चहाच्या टपरीवरचा चहा तर खास असतोच पण कधी तरी स्वत: बनवून चहा पिण्यातही वेगळीच मजा असते. त्यामुळे आलं आणि इलायची पावडर वापरून एकदा चहा जरूर बनवा...