
खजूर खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. पचन सुधारण्यापासून ते शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी खजूर खूप फायदेशीर आहे. हिवाळ्यात खजूर खाणे आरोग्यासाठी आवश्यक आहे.

खजूरमध्ये फ्लेव्होनॉइड्स, कॅरोटीनोईड्स, फिनोलिक अॅसिड असतात. ज्यामुळे शरीराची प्रतिकार शक्ती वाढते. खजूरमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात, ज्यामुळे आपल्या त्वचेला फायदा होतो.

दररोज खजूर खाणे डोळ्यांसाठी चांगले आहे. खजुरामध्ये व्हिटॅमिन ए असते जे डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. यामुळे दररोजच्या आहारामध्ये खजूरचा समावेश करा.

वजन कमी करण्यासाठी खजूर अत्यंत फायदेशीर आहे. विशेष म्हणजे पोटावरची चरबी कमी करण्यासाठी खजूरचे सेवन केले पाहिजे.

खजूर नेहमी स्वच्छ काचेच्या भांड्यात ठेवा. बरणी खजूरांनी पूर्णपणे भरू नका, असे केल्याने ते लवकर खराब होतात.