
फुफ्फुस निरोगी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, फुफ्फुसांचे आरोग्य चांगले नसल्यामुळे दमा, कर्करोग, न्यूमोनिया असे अनेक आजार होऊ शकतात. निरोगी फुफ्फुसे आपल्याला अनेक आजारांपासून वाचवण्यास मदत करतात. वाढत्या प्रदूषणामुळे आपल्या फुफ्फुसावर खूप वाईट परिणाम होतो. अशा परिस्थितीत पुरेशा प्रमाणात पाणी पिण्याबरोबरच सकस आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. फुफ्फुसे निरोगी ठेवण्यासाठी आहारामध्ये नेमक्या कोणत्या पदार्थांचा समावेश असावा, याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

फुफ्फुसे निरोगी ठेवण्यासाठी आपण आपल्या दररोजच्या आहारामध्ये लसणाचा नक्कीच समावेश करायला हवा. लसणामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. ते आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. हे फुफ्फुसांना योग्यरित्या कार्य करण्यास मदत करतात.

पालकामध्ये अनेक पोषक घटक असतात. पालकामध्ये बीटा कॅरोटीन, क्लोरोफिल, झेक्सॅन्थिन आणि ल्युटीन असते.त्यामध्ये क्लोरोफिलसारखे अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. त्यामुळे फुफ्फुस निरोगी राहण्यास मदत होते.

टोमॅटोमध्ये लाइकोपीन नावाचे तत्व असते. ते फुफ्फुसांना निरोगी आणि मजबूत बनवण्यास मदत करते, दम्याचा धोका कमी करण्यास मदत करते. फुफ्फुसांशी संबंधित समस्या जसे कर्करोग इत्यादींचा धोका कमी करते. यामुळे आहारामध्ये टोमॅटोचा नक्कीच मसावेश करा.

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, हळद खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. विशेष म्हणजे हळद आपल्याला अनेक रोगांपासून दूर ठेवण्यास मदत करते. फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये हळदीचा समावेश करावा.(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)