
जर ब्रोकोलीचा आपल्या दररोजच्या आहारामध्ये समावेश केला तर ते आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. व्हिटॅमिन सी आणि ई व्यतिरिक्त अनेक पोषक घटक हे ब्रोकोलीमध्ये असतात. ब्रोकोलीचा अनेक प्रकारे तुम्ही आहारात समावेश करू शकता.

शरीरात प्रथिने, फायबर किंवा इतर पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे अनेकदा पाठदुखी होऊ शकते. या पोषक तत्वांची कमतरता भरून काढण्यासाठी सुका मेवा खा. मात्र, सुका मेवा हा नेहमीच रात्री भिजवून ठेऊन सकाळी खावा.

सब्जा आपल्या आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर असतो. हिवाळा सोडून आपण आपल्या आहारामध्ये नेहमीच सब्जाचा समावेश करावा. सब्जा रात्री पाण्यामध्ये भिजवून ठेवा आणि सकाळी त्याचे सेवन करा.

तज्ज्ञांच्या मते, शरीरात ओमेगा-3 फॅटी अॅसिडची कमतरता असेल तर त्यामुळे थकवा आणि शरीराच्या काही भागात वेदना होऊ शकतात. यामुळे बऱ्याच वेळा पाठीत वेदना होतात. ओमेगा-3 फॅटी अॅसिडने युक्त मासांचा आहारात समावेश करा.

हे घरगुती उपाय करणे एखाद्या वेळेस ठिक आहे. पण जर तुम्हाला जास्त प्रमाणात पाठदुखीचा त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.