
बऱ्याच वेळा रात्री जेवण करूनही आपल्याला भूक लागते. मग अशावेळी आपण दही खाल्ले पाहिजे. दह्यामध्ये प्रथिने जास्त असतात आणि साखर कमी असते. यामुळे चरबी कमी होण्यास देखील मदत होते.

पीनट बटरमध्ये ट्रिप्टोफॅन असते. हे एक प्रकारचे प्रोटीन आहे जे चांगली झोप घेण्यास मदत करते. यामुळे रात्रीच्या वेळी तुम्ही पीनट बटर देखील खाऊ शकतात.

रात्री जेवूनही भूक लागली असेल तर लोणी देखील खाऊ शकतात. अर्धी वाटी जरी तुम्ही लोणी खाल्ले तरी देखील तुमचे पोट लगेचच भरेल.

केळीने देखील फटाफट पोट भरते. रात्री जर आपल्याला भूक लागली तर आपण केळी खाल्ली पाहिजे.

सुका मेवा : यामध्ये असणारे ओमेगा 3 फॅटी अॅसिड केसांचे आरोग्य राखण्यास मदत करतात. इतकेच नाही तर अनेक ड्रायफ्रुट्समध्ये कॉपर मोठ्या प्रमाणात आढळून येते आणि त्यामुळे शरीरातील मेलेनिनचे उत्पादनही वाढते. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मुलांच्या आहारात बदाम आणि अक्रोडाचा समावेश करू शकता, कारण पाहिले तर त्यात मेलॅनिन वाढवण्याची क्षमता जास्त असते.