
कॉफी एक असं पेय जे तुमचा उत्साह वाढवतं. तुम्हाला फेश करतं. झोपेतून उठल्यानंतरची पहिली कॉफी तुमचा मूड फ्रेश बनवते. आज जागतिक कॉफी दिनानिमित्त कॉफीचे काही प्रकार पाहूयात, जे तुम्ही जरूर ट्राय करू शकता...

Cappuccino... कोणत्याही कॅफेमध्ये गेलात तर या कॉफीची सर्वाधिक ऑर्डर दिली जात असल्याचं तुमच्या लक्षात येईल. कॉफी घेण्याचा विचार मनात आला की तितक्याच सहजतेने ही कॉफी डोळ्यासमोर उभी राहाते.

latte coffee... ही कॉफी स्टिम मिल्कमध्ये बनवली जाते. यात वेगवेगळे फ्लेवर्सही तुम्हाला मिळतात. यात व्हॅनिला आणि पम्पकिन स्पाइस हे फ्लेवर्स कॉफी प्रेमींना आवडतात.

फिल्टर कॉफी... दक्षिण भारतात बनणारी ही कॉफी अनेकांना आपल्या प्रेमात पाडते. फेसाळती फिल्टर कॉफी म्हणजे अनेकांचा वीक पॉईंट. निवांत संध्याकाळी दिवस मावळतीला जाताना स्वत:ला फ्रेश करण्यासाठी ही कॉफी जरूर ट्राय करा

गरमा गरम कॉफी जरी तुम्हाला प्रेमात पाडत असेल, तरी कोल्ड कॉफी मात्र तुम्हाला आपलीशी करते. तुम्हाला थंड काही प्यायचं असेल, अंगातला आळस झटकून तुम्हाला फ्रेश व्हायचं असेल तर कोल्ड कॉफी इज बेस्ट ऑप्शन!