
मुंबई | 20 मार्च 2024 : निळाशार समुद्र... पांढरी वाळू अन् डोळ्यांना दिसेल तिथपर्यंत फक्त पाणीच पाणी... हे दृश्य बघायला कुणाला नाही आवडत? तुम्हालाही जर समुद्र किनाही फिरायला आवडत असेल तर ही बातमी तुमच्याचसाठी...

शांत अन् स्वच्छ समुद्र किनारी वेळ घायवायचा असेल तर तुम्ही केरळला जाऊ शकता. केरळचा वर्कला बीच तुमच्यासाठई चांगला पर्याय असेल. अॅडव्हेंचर करायचे असतील, निसर्गाच्या सानिध्यात राहायचं असेल तर ही जागा चांगली आहे.

हॅवलॉक आईलँड... सगळ्या बाजूंनी पाण्याने वेढलेलं हे बेट... राधानगर बीचवर तुम्ही फिरायला जाऊव शकता. अंदमान निकोबारजवळ असणारं हे बीच तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरू शकतो.

भारतात, भारताबाहेर तुम्ही फिरायला जाऊच शकता पण महाराष्ट्रात राहून जर आपलं कोकण नाही फिरलात तर काय फिरलात? कोकणचे समुद्र किनारे म्हणजे स्वच्छ आणि पारंपरिक हॉलिडे डेस्टिनेशन...

कोकणातील समुद्रकिनारी देखील तुम्ही प्रचंड इन्जॉय करू शकता. यात अलिबाग, काशीद बिच, मुरूड, तारकर्ली, गुहाहर, गणपतीपुळे या ठिकाणांना तुम्ही भेट गेऊ शकता. तिथं तुम्ही फॅमिली किंवा मित्रांसोबत इन्जॉय करू शकता...