
सर्वात महत्वाचं आहे दिवसाची सुरुवात लवकर करणं! त्यासाठी सकाळी वेळेत आणि तेही लवकर उठणं गरजेचं आहे.दिवसाची सुरूवात लवकर केली तर तुमचा पूर्ण दिवस फ्रेश जातो. मात्र त्यासाठी झोप अर्धवट ठेवू नका. रात्री लवकर झोपा, सकाळी लवकर उठा...

सध्याच्या धकाधकाची जीवनात सर्वात जास्त महत्वाचं काय आहे, तर ते तुमचं आरोग्य... आरोग्य चांगलं असेल तर आयुष्यात तुम्हाला हवं असणारं यश तुम्ही सहज मिळवू शकता. त्यासाठी दिवसाची सुरुवात व्यायामाने करा.

व्यायामा इतकंच आवश्यक आहे, चांगलं खाणं... पोष्टिक घटक असणारं अन्न घ्या. शक्यतो घरचं अन्न खा. बाहेरचे पदार्थ खाणं टाळा. आहारात फळांचा समावेश करा.

पुस्तकं आयुष्य समृद्ध करतात. पुस्तकातील विचार जीवनाला दिशा देतात. त्यामुळे पुस्तकं वाचणं आवश्यक आहे. आठवड्याला किमान एक पुस्कक तरी वाचा. रात्री झोपण्यासाठी पुस्तक वाचूनच झोपण्याचा संकल्प करा.

तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्याकडे वेळ नाहीये, तर जरा थांबा... प्रत्येकाकडे 24 च तास आहेत. मात्र त्याचं योग्य नियोजन केलं तर बऱ्या गोष्टी तुम्ही करू शकता. डे प्लॅन करा... शिवाय स्वत: ला डायरी लिहिण्याची सवय लावा...