
अथर्व संजय उदावंत हा भारतातील नामांकित स्टारलाईफ प्रोडक्शन मिस्टर इंडिया 2021 या प्रतिष्ठित स्पर्धेचा 'दुसरा रनरअप' ठरला आहे.

मराठवाड्यातील नांदेड सारख्या ठिकाणी अतिशय नवख्या असलेल्या क्षेत्रात अथर्वनं लॉकडाऊनच्या केवळ दीड-दोन वर्षांच्या अतिशय कमी कालावधीत घेतलेली ही भरारी अत्यंत कौतुकास्पद आहे.

लॉकडाऊनमुळे घरातच कोंडल्या गेलेल्या तरुणाईची फार मोठी कुचंबना झाली होती, या काळात तरुण पिढी भांबावून गेली. शाळा बंद, कॉलेज बंद, बाजार पेठ बंद... सगळं काही ठप्प झालं असतानाच नांदेडच्या एमजीएम कॉलेजचा हा तरूण विद्यार्थी अथर्व संजय उदावंत स्वतःला शारीरिक व मानसिक दृष्ट्या फिट ठेवण्यासाठी धडपडत होता.

हिंगोलीचे खासदार श्री हेमंत पाटील यांचे सहाय्यक ॲड संजय उदावंत यांच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस मॉडेलिंग क्षेत्रात अर्थवनं स्वतःला झोकून दिले. दररोज जिम, मॉर्निंग वॉक, स्विमिंग, धावणे, योगाभ्यास, योग्य पोषक आहार आणि सौंदर्य या सगळ्या गोष्टींवर त्यानं भर दिला आणि बघता बघता दिडदोन वर्षांतच अथर्वची यशस्वी वाटचाल सुरू झाली.

संपूर्ण भारतातून या मिस्टर इंडिया स्पर्धेसाठी हजारहून अधिक तरुण, तरुणींची प्राथमिक फेरीत निवड करण्यात आली होती. आग्रा येथे दिनांक 1 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट दरम्यान अंतिम स्पर्धेसाठी पाच फेऱ्या घेण्यात आल्या त्यात अंतिमच बावीस तरूण, तरुणींची निवड करण्यात आली.

नांदेडचा पहिलाच फिटनेस मॉडेल ठरलेल्या अथर्व संजय उदावंतला अतिशय अटीतटीच्या पहिल्याच स्पर्धेत मिस्टर इंडिया 'सेकंड रनरअप' हा किताब मिळाला.