
जाणून घ्या काळ्या ओठांवर उपचार करण्यासाठी 3 नैसर्गिक उपाय

हे स्क्रब तयार करण्यासाठी, एक चमचे कॉफी आणि मध मिसळा आणि पेस्ट तयार करा. सुमारे दोन मिनिटे हलक्या हाताने ओठ्यांची मालिश करा आणि नंतर पाण्याने धुवा. यामुळे कोरडी त्वचा निघण्यास मदत होईल आणि आपले ओठ गुलाबी दिसतील.

केवळ मध लावल्याने देखील ओठांच्या समस्येतून आराम मिळतो. जर तुमचे ओठ कोरडे होत असतील तर ग्रीन टीची बॅग कोमट पाण्यात ठेवा आणि ती ओठांवर लावा. आपण दररोज काही मिनिटे हा उपाय करू शकता. हे लक्षात ठेवा की ग्रीन टीची बॅग जास्त गरम होणार नाही.

गुलाबच्या पाकळ्या, मध आणि दूध मिक्स करून त्याची पेस्ट तयार करा आणि ओठ्यांवर लावा. त्यानंतर थंड पाण्याने आपले ओठ धुवा. यामुळे ओठ्यांवरील काळपटपणा दूर होण्यास मदत होईल.

तुमचे जर ओठ सतत उलत असतील तर ओठांवर खाेबरेल तेल लावा. यामुळे तुमचे ओठ मऊ होतील. रात्री झोपण्याआधी सुरकुतलेल्या ओठांवर खोबरेल तेल लावा. खोबरेल तेल त्वचेसाठी चांगले असते. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)