
केमिकल्सच्या मदतीने त्वचेची काळजी घेण्याऐवजी आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत. विशेष म्हणजे सध्याच्या हिवाळ्याच्या हंगामात त्वचेची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे.

त्वचेसाठी फळांचे फेसपॅक अत्यंत फायदेशीर असतात. आपण पपईमध्ये मुलतानी माती मिक्स करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

केळी देखील आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. केळीमध्ये दूध आणि खोबरेल तेल मिक्स करून चेहऱ्याला लावा. यामुळे त्वचेचा कोरडेपणा दूर होण्यास मदत होईल.

अननसाच्या फेसपॅक देखील आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. यासाठी अननसाची पेस्ट घ्या आणि त्यामध्ये गुलाब पाणी मिक्स करा आणि चेहऱ्याला लावा.