
टोमॅटो आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहेत. टोमॅटोमध्ये लाइकोपीन, अल्फा, बीटा-कॅरोटीन, एस्कॉर्बिक अॅसिड आणि व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असतात. टोमॅटो मुक्त रॅडिकल्समुळे झालेल्या त्वचेपासून संरक्षण करण्यास मदत करते.

टोमॅटोमध्ये लाइकोपीन देखील असते जे त्वचेला कडक उन्हापासून वाचवते. त्यातील अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-कोलेजेनेस त्वचेचे अकाली वृद्धत्व रोखतात.

टोमॅटो आणि लिंबूचा फेसपॅक आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी आपल्याला एक टोमॅटो आणि दोन चमचे लिंबाचा रस लागणार आहे. हा फेसपॅक लावल्यामुळे त्वचा तजेलदार दिसते.

चेहऱ्याचा रंग उजळवण्यासाठी चेहऱ्याला टोमॅटो आणि गुलाब पाण्याचा फेसपॅक लावला पाहिजे. यासाठी अर्ध टोमॅटो आपल्याला लागणार आहे. हा फेसपॅक आपण आठ दिवसातून तिनदा लावला पाहिजे.

सुंदर त्वचा मिळवण्यासाठी मध आणि लिंबाचा फेसपॅक चेहऱ्याला लावला पाहिजे. हा फेसपॅक तयार करण्यासाठी आपल्याला एक टोमॅटो आणि दोन चमचे मध लागणार आहे. हा फेसपॅक आपण आठ दिवसातून दोन वेळा लागला पाहिजे.