
तंदुरुस्त राहण्यासाठी, ताण कमी करण्यासाठी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी योगा खूप फायदेशीर आहे. आपल्यापैकी बरेच लोक घरी किंवा एखाद्या बागेमध्ये योगा करतात. मात्र, आज आम्ही तुम्हाला योगा करण्यासाठी खास असलेली काही ठिकाणे सांगणार आहोत. चला, जाणून घेऊया योगासाठी प्रसिद्ध असलेली ठिकाणे.

पुद्दुचेरी हे शहर अत्यंत शांत आहे. याठिकाणी अनेक योगा शिबीरांचे आयोजन केले जाते. शांतपणे योगा करण्यासाठी हे एक खास ठिकाण आहे.

गंगा नदीत सामावलेले ऋषिकेश मनाला शांती आणि आराम देते. येथे तुम्ही शांतपणे योग करू शकता. डोंगर आणि नद्यांच्या सहवासामध्ये येथे तुम्ही योगा करू शकता.

योगा करण्यासाठी चेन्नई हे देखील खूप प्रसिध्द ठिकाण आहे. आपण शांतपणे येथे योगा करू शकता. तसेच याठिकाणी अनेक योगा शिबीरांचे आयोजन केले जाते.

समुद्राच्या लाटांचा आवाज आणि आकाशात विखुरलेल्या लाल रंगाच्या अद्भुत दृश्यांसह योगासने केल्यावर मनाचा थकवा पूर्णपणे दूर होईल. गोव्याच्या समुद्र किनारी देखील तुम्ही योगा करू शकता.