
हेन्स शू हाऊस हे एक खास पध्दतीने तयार केलेले घर आहे. हे घर बुटाच्या आकाराचे आहे. पेनसिल्व्हेनियाला येणारे पर्यटक हे खास घर बघण्यासाठी नेहमीच आवडीने येतात. हे घर हेल्म टाउनशिपमध्ये आहेत.

बब्ल हाऊस हे फ्रान्समध्ये आहे. ही खास इमारत 1975 ते 1989 दरम्यान बांधली गेली. फ्रान्समध्ये पर्यटनासाठी गेल्यावर येथे भेट देण्यासाठी नक्की जा. तुमच्या मुलांना हे ठिकाणी नक्कीच आवडेल.

कॅन्सस सिटी लायब्ररी अशा प्रकारे बनवण्यात आली आहे की पाहणाऱ्यांना एकदा पाहून आश्चर्य वाटेल. इमारतीच्या पुढील भागाला चक्क पुस्तकासारखा आकार देण्यात आला आहे. पुस्तक प्रेमिंसाठी हे खास ठिकाण आहे.

लॉन्गबर्गर मुख्यालय: हे एक प्रकारचे ऑफिसच आहे. हे 1997 मध्ये बांधले गेले होते. याला लॉन्गबर्गरचे मुख्य कार्यालय म्हणतात आणि त्याचा आकार टोपलीसारखा आहे.

ही एक जगातील खूपच हटके इमारत आहे. हे एक रेस्टॉरंट आणि ज्याचे नाव उल्टा रेस्टॉरंट आहे. हे उल्टा रेस्टॉरंट जॉर्जियामध्ये आहे. जर तुम्ही जॉर्जियाला भेट देण्याचा विचार करत असाल, तर इथल्या या आकर्षक रेस्टॉरंटमधील जेवणाचा आस्वाद नक्कीच घ्या.