Liquor Share: बाजारात मोठी पडझड, पण दारु कंपन्यांची धमाल, शेअर्समुळे झिंगले गुंतवणूकदार

Liquor Share: बाजारात मोठी पडझड दिसली. बाजारात विक्री सत्र दिसून आले. पण या दोन दारु कंपन्यांच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना लॉटरी लावली. आज शेअस बाजारात हे स्टॉक सात टक्क्यांपर्यंत वधारला.

| Updated on: Mar 07, 2026 | 4:38 PM
1 / 6
Liquor Share: स्टॉक बाजारात मोठी पडझड दिसली. बाजारात विक्री सत्र दिसून आले. या परिस्थितीतही या दोन शेअर्सने धमाल उडवून दिली. दारू कंपन्यांचे स्टॉक 7 टक्क्यांनी वधारले. गुंतवणूकदारांना कमाई करता आली.

Liquor Share: स्टॉक बाजारात मोठी पडझड दिसली. बाजारात विक्री सत्र दिसून आले. या परिस्थितीतही या दोन शेअर्सने धमाल उडवून दिली. दारू कंपन्यांचे स्टॉक 7 टक्क्यांनी वधारले. गुंतवणूकदारांना कमाई करता आली.

2 / 6

युनायटेड ब्रिवेरीज आणि युनायटेड स्प्रिट्स लिमिटेड या दोन मद्य कंपन्यांनी मोठी झेप घेतली. या दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आली. या दोन्ही कंपन्यांचे शेअर्स बाजारात दुडूदुडू धावले. इन्ट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांना मोठा फायदा झाला.

3 / 6

या दोन्ही कंपन्यांना कर्नाटक सरकारने मोठा दिलासा दिला आहे. कर्नाटक सरकारने नवीन धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार, सरकार आता दारूच्या किंमती निश्चित करणार नाही.उत्पादक कंपन्या बाजारातील स्पर्धा पाहून त्यांच्या किंमती ठरवतील. याविषयीचा स्लॅब 16 हून 8 करण्याचा निर्णय पण जाहीर करण्यात आला आहे.

4 / 6

United Breweries चा शेअर बीएसईवर 1659.55 रुपयांवर उघडला. दिवसभरात या कंपनीच्या शेअरचा भाव 7.5 टक्क्यांच्या तेजीसह 1771 रुपयांच्या इंट्रा डे उच्चांकावर पोहचला. बाजार बंद झाला तेव्हा हा शेअर 5.43 टक्क्यांच्या उसळीसह 1736 रुपयांवर होता.

5 / 6

United Sprites स्टॉक 1311.25 रुपयांवर उघडला. दिवसभरात कंपनीचा शेअर 6.9 टक्क्यांच्या तेजीसह 1418 रुपयांच्या इंट्रा डे उच्चांकावर पोहचला. शेअर बाजार बंद होताना हा स्टॉक 1387.50 रुपयांवर आला. एका वर्षात या स्टॉकच्या किंमतीत 4.06 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे.

6 / 6

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us